नई दिल्ली

श्रीराम जन्मभूमी मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी अपेक्षित

:

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.

 अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठासमोर ही सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना हेही या पीठात सहभागी आहेत. याचिकांमध्ये या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी करण्याची, तसेच आर्थिक व्यवहारांचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या, म्हणजेच एसआयटीच्या प्राथमिक तपासात देणगीतील रोख रकमेच्या मोजणीत गंभीर त्रुटी आढळल्याचं समोर आलं आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत देणगी मोजणी प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेतील काही उणिवा निदर्शनास आल्याचं तपासात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात यापूर्वी काही संशयितांना अटक करण्यात आली असून, तपास अद्याप सुरू आहे.

या प्रकरणातील सुनावणीकडे देशभराचं लक्ष लागलं असून, सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर कोणते निर्देश देतं, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Admin

दैनिक समाचार पत्र मनस्वी वाणी‘जो राजधानी दिल्ली, उत्तराखंड और उत्तर प्रदेश—इन तीन राज्यों से एक साथ प्रकाशित होता है’ पिछले दस वर्षों से पाठकों की पसंद और विश्वास के साथ निरंतर प्रकाशित हो रहा है। इस समाचार पत्र ने अपने निष्पक्ष समाचार, सामाजिक सरोकारों और जनहित से जुड़े मुद्दों को प्रमुखता देकर पाठकों के बीच एक विशेष पहचान बनाई है I

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button